DR. BABSAHEB AMBEDKAR MARATHWADA UNIVERSITY CHH. SAMBHAJINAGAR AFFILIATED
TARAI SHIKSHAN SANSTHA PAITHAN SANCHALIT
( Ex. State finance minister) president, Tarai shikshan sanstha, Paithan.
secretary, Tarai shikshan sanstha, Paithan.
I/C. Principal, Tarai Arts and Science College, Paithan.
विद्यार्थी मित्रहो, महाविद्यालयाच्या प्रांगणात आपले मनस्वी स्वागत आहे. आपण महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करत आहात यासारखी दुसरी आनंददायी गोष्ट नाही. महाविद्यालयाचा संपूर्ण कारभार हा विद्यार्थी केंद्रभूत ठरवूनच केला जातो. विद्यार्थ्यांचे हित, उज्वल भविष्य, विद्यार्थ्यांचा विकास आणि पर्यायाने महाविद्यालयाचा विकास हेच आमचे लक्ष आणि उद्दिष्ट राहणार आहे. विद्यार्थी मित्रहो आपणास जागतिक स्पर्धेला तोंड द्यायचे आहे याचे भान ठेवून आपल्या सर्वांगीण विकासासाठी, गुणवत्तेचा दर्जा राखण्यासाठी, आपल्या महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व संस्थेचे सर्व पदाधिकारी कटिबद्ध आहेत. अभ्यास हेच एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर असू द्या.
संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे या ज्ञानमंदिराचे वातावरण आणि तुमचे जीवन ‘तेजोमय प्रकाशासारखे ज्ञानाने फुलवू दया.’ तुम्हा सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा आणि आपले पुनश्च एकदा स्वागत..!